जळगाव प्रतिनिधी । शहरातील चौघुले प्लॉट परिसरात राहणाऱ्या महिलेला सामाईक शौचालयाच्या वादातून चार जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी त्या चार जणांविरुद्ध शनिपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील चौघुले प्लॉट येथे राहणाऱ्या वृषाली पंकज साळुंखे (वय – २२) ह्या पती व सासु सासऱ्यांसह सोबत राहतात. त्यांच्या घराच्या बाजूला त्यांचे नातेवाईक विजय सुभाष साळुंखे राहातात. ६ मे रोजी सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास विजय साळुंखे हा सामाईक शौचालयात बसला असतांना वृषाली यांच्या सासू यांनी दरवाजा लावून घे असे सांगितल्याचा राग आल्याने महिला वृषाली यांच्यासह पती पंकज साळुंखे, सासू आणि सासरे यांना विजय साळुंखे, विजयची पत्नी पूनम साळुंखे, बापू तुकाराम ठाकरे, अमोल बापू ठाकरे रा. वटार ता.चोपडा यांनी शिवीगाळ व मारहाण केली. विजयची पत्नी पुनम साळुंखे हिने वृषाली यांच्या कमरेला व पोटाला चावा घेतला. महिलेच्या फिर्यादीवरून चार जणांविरूध्द शनीपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अभिजित सैंदाणे करीत आहे.