यावल प्रतिनिधी । यावल-भुसावळ रस्त्यावर सुरू असलेले भांडण सोडिवल्याचा राग आल्याने तरुणावर पाच ते सहा जणांनी चाकू हल्ला केल्याची घटना घडली. याप्रकरणी त्या पाच जणांविरुद्ध व समोरच्या गटातील चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील स्वामिनारायण नगरातील रहिवासी राहुल संजय चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उमेश घारु व भारत धर्मा घारु यांचा दुचाकीचा कट लागला या कारणावरून बापु महाजन यांच्या सोबत भांडण होत होते ते फिर्यादीने सोडवले. याचा राग येत फिर्यादीच्या घरा समोर येत अमर जगु घारु व उमेश जगु घारु यांनी त्यांचे दोन्ही हात धरुन धर्मा जगु घारु याने त्याचे हातातील चाकुने पोटात बरगडीजवळ दुखापत केली तर करन उमेश घारु व भारत धर्मा घारु यांनी हातात काठ्या घेवुन फिर्यादीचे चुलत भाऊ एकनाथ दुर्गादास चव्हाण तसेच महेंद्र दुर्गादास चव्हाण व चुलते दुर्गादास गणेश चव्हाण अशांना काठ्यांनी मारहाण केली व शिविगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरून अमर घारु, उमेश घारु, धर्मा घार, करन घारु व भारत घारु या पाच जणांविरूध्द यावल पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अजमल पठाण करीत आहे. दरम्यान, विश्वनाथ उमेश घारु याने दिलेल्या फिर्यादी नुसार राहुल संजु चव्हाण, संजु गणेश चव्हाण, दुर्गादास गणेश चव्हाण, प्रल्हाद गणेश चव्हाण यांनी फर्यादीस चापटा बुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली म्हणुन अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील काही दिवसापासुन अशा प्रकारे जमावाकडुन एकमेकांवर हल्ले मारहाण, अवैध जुगार अड्डयावर कारवाई करण्यास गेलेल्या पोलीसांना झालेली धक्काबुकीची घटना असो अशा अनेक घटना यावल पोलीस, स्टेशन अंतर्गत घडत असुन , गुंड व गुन्हेगारांवरचा पोलीसांचा धाक संपला की काय असे प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे.