Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आजचे राशीभविष्य, शनिवार, १५ मे २०२१

by Divya Jalgaon Team
May 15, 2021
in जळगाव, राशीभविष्य
0
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

मेष:- मानसिक चंचलता जाणवेल. विचारांच्या गर्दीत वाहून जाऊ नका. भावंडांची मदत घेता येईल. जवळच्या ठिकाणी फेरफटका मारून यावा. आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडाल.

वृषभ:- तुमच्यातील खळखळता उत्साह जागृत ठेवावा. कामाचा ताण जाणवेल. वेळेचे नियोजन केल्यास बर्‍याच गोष्टी जमून येतील. इतरांवर तुमचा चांगला प्रभाव राहील. घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल.

मिथुन:- आपल्याचा शब्दावर ठाम राहाल. दिवस मर्जीप्रमाणे व्यतीत कराल. क्षणिक गोष्टींनी खुश व्हाल. वरिष्ठांच्या मर्जीनुसार वागावे. थोडा स्वत:साठी वेळ काढावा.

कर्क:- मागील गोष्टींची पुनरावृत्ती टाळावी. जोडीदाराच्या वागण्याचे आश्चर्य वाटू शकते. मानसिक अस्थिरता जाणवेल. भावनेच्या अति आहारी जाऊ नका. वैचारिक गोंधळ उडू शकतो.

सिंह:- नोकरदारांचा मान वाढेल. नवीन स्नेहसंबंध जुळून येतील. जवळच्या लोकांची गाठ पडेल. लहान मुलांशी खेळण्यात रमून जाल. मनातील जुनी इच्छा पूर्ण होईल.

कन्या:- दिवसभर कामाची गडबड राहील. आपली मनस्थिती गोंधळलेली राहू शकते. कामाचे व्यवस्थित मूल्यमापन करावे. एकाच वेळी अनेक कामात हात घालू नये. इतरांना स्वखुशीने मदत कराल.

तूळ:- चांगला व्यावसायिक लाभ संभवतो. कामाच्या ठिकाणी समाधान लाभेल. नसत्या गोष्टींमध्ये लक्ष घालू नका. फक्त आपल्याच कामाशी मतलब ठेवून वागावे. कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.

वृश्चिक:- आपण स्वत:च आपल्या त्रासाला कारणीभूत ठरू शकाल. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. भावंडांना मदत करता येईल. अचानक धनलाभ संभवतो. गुंतवणूक करतांना संपूर्ण विचार करावा.

धनू:- तुमच्यातील धैर्य वाढीस लागेल. सारासार विचार करूनच मग कृती करावी. हातापायांच्या किरकोळ इजांकडे दुर्लक्ष करू नका. कोणतेही साहस करतांना घाई करू नका. प्रवासात खबरदारी घ्यावी.

मकर:- प्रेमातील जवळीक जोपासावी. मुलांशी किरकोळ कारणावरून वाद संभवतात. स्वत:च्या करमणुकीचा मार्ग शोधावा. जुन्या गोष्टींमध्ये फार काळ रेंगाळू नका. अनावश्यक गोष्टींवरील खर्च टाळावा

कुंभ:- मुलांच्या चंचलतेकडे बारीक लक्ष ठेवावे. रेस, जुगार यांपासून दूर राहावे. आततायीपणे कोणतेही काम करू नये. पित्त विकाराचा त्रास जाणवेल. कामाचा ताण वाढू शकतो.

मीन:- घरगुती कामात अधिक वेळ जाईल. मित्रमंडळींमध्ये खोडकरपणा कराल. दिवस मजेत घालवाल. हातातील अधिकाराचा वापर करावा. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करावा.

Share post
Tags: १५ मे २०२१आजचे राशीभविष्यशनिवार
Previous Post

जिल्ह्यात आज ६८१ रुग्ण कोरोनाबाधित आढळले, ९ जणांचा मृत्यू

Next Post

राज्य सरकार देणार ऑक्सिजन वाहतुकीसाठी रेल्वेला १ कोटींचा निधी

Next Post
राज्य सरकार देणार ऑक्सिजन वाहतुकीसाठी रेल्वेला १ कोटींचा निधी

राज्य सरकार देणार ऑक्सिजन वाहतुकीसाठी रेल्वेला १ कोटींचा निधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group