जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज दिवसभरामधून ६८१ रुग्ण कोरोनाबाधित आढळले असून तर आज ९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाले आहे. तसेच आज जिल्हाभरात ८११ जणांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.
जळगाव शहर-६०, जळगाव ग्रामीण-१६, भुसावळ-८२, अमळनेर-२९, चोपडा-६८, पाचोरा-४, भडगाव-३, धरणगाव-२९, यावल-३२, एरंडोल-४४, जामनेर-१६, रावेर-४७, पारोळा-३५, चाळीसगाव-९२, मुक्ताईनगर-७२, बोदवड-३४ आणि इतर जिल्ह्यातील १८ असे एकुण ६८१ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ३३ हजार ८९३ बाधित रूग्ण आढळले आहे. त्यापैकी १ लाख २१ हजार ७८२ रूग्ण कोरोनामुक्त झाली आहेत तर ९ हजार ७१६ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात ९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.