जळगाव प्रतिनिधी – जिल्ह्यात आज 843 रुग्ण कोरोनाबधित आढळले असून तर आज दिवसभरात 14 बाधितांचा मृत्यू झाले आहे. तसेच आज 740 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.
जळगाव शहर-६९, जळगाव ग्रामीण २५, भुसावळ-८९, अमळनेर-९४, चोपडा-१०७, पाचोरा-७९, भडगाव-३, धरणगाव-२६, यावल-२०, एरंडोल-२८, जामनेर-६४, रावेर-५१, पारोळा-१४, चाळीसगाव-६२, मुक्ताईनगर-६३, बोदवड-४२ आणि इतर जिल्ह्यातील ७ असे एकुण ८४३ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ३१ हजार ५७४ बाधित रूग्ण आढळून आले आहे. यापैकी १ लाख १९ हजार ३०८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे तर ९ हजार ९०३ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात १४ बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.