Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

खत बचतीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन

by Divya Jalgaon Team
May 12, 2021
in जळगाव, प्रशासन
0
खत बचतीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन

rasayanik khat

जळगाव  – राज्यामध्ये रासायनिक खतांचा कमीत कमी व संतुलित वापर होण्याच्या उद्देशाने खरिप 2021 मध्ये खत बचतीची विशेष मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. यामध्ये किमान 10 टक्के रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी मे महिन्याच्या चालु सप्ताहात या मोहीमेच्या प्रचार व प्रसिध्दीसाठी विशेष प्रयत्न कृषि विभागामार्फत क्षेत्रियस्तरावर करण्यात येत आहे.

या मोहिमेंतर्गत शेतक-यांना विविध पिकांसाठी विशेषत: भात, सोयाबीन, कापुस, ऊस इत्यादीकरीता खत वापराचे विविध फायदेशीर पर्याय उपलब्ध करून देणे, प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर जमिन सुपिकता निर्देशांक दर्शविणारा फलक प्रदर्शित करणे व त्याचे सामुहीक वाचन करणे, जमिन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा वापर करणे, जैविक खतांची बीज प्रक्रीया करणे, हिरवळीच्या खतांच्या बियाणाचे अनुदानावर वितरण करणे, भात पिकाकरीता युरीया ब्रिकेटचा वापर वाढविण्यासाठी त्याचे उत्पादन व वितरण करणे, कृषि सेवा केंद्र चालकांना प्रशिक्षण देणे, जमिनीत सेंद्रिय कर्बाची वाढ होण्यासाठी उसाची पाचट जागेवर कुजविणे, व्हर्मीकंपोस्ट, गांडुळ खत, कंपोस्ट खत यांचा वापर वाढवुन रासायनिक खतांची मागणी कमी करणे. तसेच विविध पिक योजनांतर्गत प्रशिक्षण वर्ग व प्रात्यक्षिकांचे आयोजन करणे इत्यादी बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे. या मोहिमेत जास्तीत जास्त शेतक-यांनी सहभागी होण्यासाठी कृषि विभागाने आवाहन केले आहे.

Share post
Tags: Divya Jalgaonfarmar relatedखत बचतीसाठी विशेष मोहिमेचे आयोजनरासायनिक खत
Previous Post

रमजान ईद साठी बाजार मध्ये विशेष सूट द्या ; मुस्लिम ईदगाह ट्रस्ट

Next Post

जिल्ह्यात आज 843 रुग्ण कोरणा बाधित आढळले, 14 जणांचा मृत्यू

Next Post
जिल्ह्यात आज १०६३ रूग्ण कोरोनाबाधित आढळले, २१ जणांचा मृत्यू

जिल्ह्यात आज 843 रुग्ण कोरणा बाधित आढळले, 14 जणांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group