Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जिल्ह्यातील २५ दिव्यांग गरजू बालकांच्या कुटुंबाला महिनाभराचा किराणा भेट

उडाण दिव्यांग केंद्र आणि इनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे बायव्ह्यूचा उपक्रम

by Divya Jalgaon Team
May 10, 2021
in जळगाव, सामाजिक
0
जिल्ह्यातील २५ दिव्यांग गरजू बालकांच्या कुटुंबाला महिनाभराचा किराणा भेट

जळगाव – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले असून जिल्ह्यात अनेक दिव्यांग बालकांना घरीच राहावे लागत आहे. दिव्यांग बालकांचे पालक देखील घरीच असून कुटुंबाच्या खाण्यापिण्याची अडचण होत आहे. शहरातील रुशील मल्टिपर्पज फाऊंडेशन संचालित उडाण दिव्यांग प्रशिक्षण केंद्र आणि इनरव्हील क्लब ऑफ बॉम्ब बायव्ह्यूतर्फे जिल्ह्यातील २५ दिव्यांग गरजू बालकांच्या कुटुंबाला महिनाभर पुरेल असा किराणा भेट देण्यात आला.

दिव्यांग प्रशिक्षण केंद्राच्या पोस्टल कॉलनीतील कार्यालयात एक छोटेखानी कार्यक्रमात औपचारिकता म्हणून काही किट वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला समाजकल्याण अधिकारी भरत चौधरी, उडाणच्या अध्यक्षा हर्षाली चौधरी, चेतन वाणी, बाळू चौधरी, विनोद शिरसाळे, जयश्री पटेल, अनिता पाटील, सोनाली भोई, लक्ष्मी वाघ, वनिता पवार आदी उपस्थित होते.

उर्वरित किराणा किट शिरसोली, चाळीसगाव येथील बालकांच्या कुटुंबाला सुपूर्द करण्यात आले आहेत. इनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे बायव्ह्यू व श्यामश्री भोसले यांचे उपक्रमासाठी सहकार्य लाभले आहे. लॉकडाउन काळ असेपर्यंत उडाणच्या माध्यमातून दिव्यांग बालकांना मदत पोहचविण्याचा त्यांचा मानस आहे. किराणा किटमध्ये गव्हाचे पीठ, डाळ, चहा, साखर, तिखट, हळद, तेल, साबण, कांदा, बटाटे, टूथपेस्टचा समावेश आहे.

Share post
Tags: Divya Jalgaonइनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे बायव्ह्यूदिव्यांग गरजू बालकांच्या कुटुंबालादिव्यांग प्रशिक्षण केंद्र
Previous Post

केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीने कोरोना योद्धांचा सन्मान

Next Post

सुप्रिम इंडस्ट्रीजचे सुप्रिम फाऊंडेशन’ उभारणार अत्याधुनिक सार्वजनिक स्वच्छतागृह

Next Post
सुप्रिम इंडस्ट्रीजचे सुप्रिम फाऊंडेशन’ उभारणार अत्याधुनिक सार्वजनिक स्वच्छतागृह

सुप्रिम इंडस्ट्रीजचे सुप्रिम फाऊंडेशन’ उभारणार अत्याधुनिक सार्वजनिक स्वच्छतागृह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group