जळगाव – शिक्षण मंत्रालय भारत सरकार यांच्यातर्फे करण्यात येणारा नॅशनल अचीव्हमेंट सर्वे 2021 हा केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड यांच्यावतीने पार पाडण्यात येतो. अर्थातच नॅशनल अचीव्हमेंट सर्वे करण्याची जबाबदारी सोपवलेली आहे.
या सर्वे अंतर्गत सद्यस्थितीत शैक्षणिक प्रणाली संबंधी ची बाजू समजून घेण्याच्या उद्देशाने हे एक नमुना आधारित सर्वेक्षण केले जाते. यासाठी भारतातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रतिनिधींची नेमणूक केली जाते. या अतिमहत्त्वाच्या कामगिरीसाठी जळगाव जिल्ह्यामधून के.सी.ई. सोसायटी संचलित ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या सुषमा कंची यांची निवड केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड यांच्या तर्फे परिरक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. या अनुषंगाने त्यांना संपूर्ण जिल्ह्याच्या शिक्षण प्रणालीच्या आरोग्य सर्वेक्षणाचे जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.
याअंतर्गत सीबीएसई ने नमूद केल्या प्रमाणे शाळांचे पूर्व सर्वेक्षण पडताळणीचे आयोजन करण्याची अतिमहत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आलेली आहे. त्यासोबतच सर्वेक्षणाअंतर्गत सामग्रीचे सामग्रीसाठी कस्टडीयन म्हणून त्यांना काम पहावयाचे आहे . त्यांना त्यांच्या झालेल्या या नेमणुकीबद्दल संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केलेले आहे. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांना या अति महत्त्वाच्या जबाबदारीला पार पाडण्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत.