जळगाव प्रतिनिधी । गोपाळपूरा येथील हनुमान मंदिराजवळून एका तरुणाची ३५ हजार रुपये किमतीची दुचाकी लंपास केल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील शनिपेठ येथील गोपाळपुरा हनुमान मंदिरजवळ संतोष नामदेव गव्हाणे (वय-३८) हा तरूण काम करून उदरनिर्वाह करतो. ४ एप्रिल रोजी पहाटे १ ते ४ वाजेच्या सुमारास मंदीरासमोर लावलेली (एमएच १९ सीटी ७५८१) क्रमांकाची ३५ हजार रूपयेकिंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले. परिसरात शोधाशोध करून दुचाकी मिळून आली नाही.
याप्रकरणी बुधवारी रात्री संतोष गव्हाणे यांच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रघुनाथ महाजन करीत आहे.