मेष:- कामाची धावपळ वाढू शकते. गुंतवणुकीचा चांगला पर्याय निवडाल. कामातील मोबदल्याकडे लक्ष द्यावे. मौल्यवान वस्तू खरेदी कराल. स्वकष्टावर अधिक भर द्याल.
वृषभ:- आवडी निवडीबाबत लक्ष द्याल. हसत-हसत आपले मत मांडाल. गोड बोलून कार्यभाग साधता येईल. आवडीचे पदार्थ खायला मिळतील. लोकांवर तुमची उत्तम छाप पडेल.
मिथुन:- कामानिमित्त दिवसभर बाहेर राहाल. क्षणिक सौख्यात रमून जाल. चोरांपासून सावध राहावे. जामीनकीच्या व्यवहारात दक्षता बाळगावी. वरिष्ठ तुमच्यावर नाराज होऊ शकतात.
कर्क:- क्षुल्लक वाद वाढवू नये. मनातील इच्छा पूर्ण करून घ्याल. जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल. सरकारी कामे पुढे सरकतील. जोडीदाराची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करावा.
सिंह:- प्रकृतीची हेळसांड करू नका. वेळेचे महत्त्व लक्षात घ्यावे. कामातील लाभाकडे दुर्लक्ष नको. वरिष्ठांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल. प्रतिकूलतेतून मार्ग काढावा.
कन्या:- भांडखोर लोकांपासून दूर राहावे. कामाचा ताण जाणवेल. वैचारिक दृष्टिकोन बदलून पहावे. उष्णतेचे विकार संभवतात. तुमच्याबद्दल लोकांचा गैरसमज होऊ शकतो.
तूळ:- मुलांचे स्वतंत्र विचार समजून घ्यावेत. मित्रांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. मैदानी खेळाची आवड जोपासाल. कामे वेळेत पार पडतील. जमिनीच्या व्यवहारातून लाभ संभवतो.
वृश्चिक:- वैवाहिक सौख्याकडे लक्ष द्यावे. भाजणे, खरचटणे यांसारखे त्रास संभवतात. दिवसभर कामाचा त्रास राहील. प्रवासात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. संभाषण कौशल्य दाखवण्याची संधी लाभेल.
धनू:- कौटुंबिक गोष्टींना अधिक प्राधान्य द्याल. परिस्थितीला समजून घेण्याचा प्रयत्न करावा. टीकेमुळे निराश होऊ नका. मनाची चंचलता अध्यात्माने दूर करण्याचा प्रयत्न करावा. अधिकारांची जाणीव ठेवावी.
मकर:- निराशाजनक विचार करू नये. आत्मविश्वास सोडून चालणार नाही. आळस बाजूला सारून कामे करावीत. बोलताना तिखट शब्दांचा वापर कमी करावा. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नये.
कुंभ:- कामात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. चटकन रागवू नका. घाई-घाईने कोणतेही कृती करू नका. पित्त विकाराचा त्रास जाणवेल. अवाजवी अपेक्षा बाळगू नका.
मीन:- जुनी इच्छा पूर्णत्वास येईल. केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. उत्तम व्यावसायिक लाभ मिळेल. थोरांचा मोलाचा सल्ला मिळेल. सामुदायिक वादविवादापासून दूर राहावे.