Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आजचे राशीभविष्य, सोमवार, ३ मे २०२१

by Divya Jalgaon Team
May 3, 2021
in जळगाव, राशीभविष्य
0
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

मेष:- दिवसभर कामाची धावपळ राहील. अती श्रमामुळे थकवा जाणवेल. काही अडचणीतून मार्ग काढता येईल. बदलांकडे सकारात्मकतेने पहावे. घरगुती वातावरण चांगले राहील.

वृषभ:- वैचारिक दृष्टिकोन बदलून पाहावा. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. गुरुकृपेचा लाभ उठवावा. तीर्थयात्रेचे योग येतील. दिवस खेळीमेळीत घालवाल.

मिथुन:- मुलांची चिंता लागून राहील. स्त्री वर्गापासून दूर राहावे. लबाड लोकांची संगत टाळावी. गुंतवणुकीचा पुनर्विचार करावा. आर्थिक व्यवहार सावधानतेने करावेत.

कर्क:-  जोडीदाराशी मतभेद संभवतात. मनाची चंचलता टाळण्याचा प्रयत्न करा. अती भावनाविवश होऊ नका. जुन्या गोष्टी उगाळत बसू नये. लहानांच्यात लहान होऊन वावराल.

सिंह:- पोटाची काळजी घ्यावी. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत. कलेला पोषक वातावरण मिळेल. गोड बोलून फायदा साधून घ्याल. कमिशन मधून चांगली कमाई होईल.

कन्या:- मुलांना काही नवीन गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करावा. मतभेदाला खतपाणी घालू नका. नातेवाईकांशी सलोख्याचे संबंध ठेवावेत. छुप्या शत्रूंचा विरोध मावळेल. जोडीदाराची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करावा.

तूळ:- मुलांच्या धडपडीकडे लक्ष ठेवावे. क्रोधाला बळी पडू नका. कौटुंबिक नैराश्य दूर करण्याचा प्रयत्न करावा. नवीन गुंतवणूक सावधानतेने करावी. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो.

वृश्चिक:- प्रवासात क्षुल्लक अडचण येऊ शकते. वाहन चालवताना सतर्कता बाळगावी. पत्नीचे मत विरोधी वाटेल. भावंडांचे प्रश्न भेडसावतील. कौटुंबिक सहलीचा विचार करावा.

धनू:- कौटुंबिक खर्च वाढेल. हाताखालील लोक विश्वासू मिळतील. इतरांचा विश्वास संपादन करावा. मत्सराला बळी पडू नका. कामाच्या ठिकाणी समाधान लाभेल.

मकर:– नवीन विचारांची कास धरावी. तिखट व तामसी पदार्थ आवडीने खाल. स्वभावात काहीसा हट्टीपणा येईल. घरात तुमचा दबदबा राहील. करमणुकीच्या कार्यक्रमात गुंग व्हाल.

कुंभ:- शांत व संयमी विचार करावा. घरगुती वातावरण प्रसन्न राहील. मनाची चंचलता दूर करावी. धार्मिक स्थळांना भेट द्याल. आध्यात्मिक बळ वाढवावे.

मीन:- प्रकृतीच्या बाबतीत हयगय करू नका. सामुदायिक वादात लक्ष घालू नका. मनातील इच्छा पूर्ण होईल. स्त्रियांमुळे मतभेद संभवतात. अती चौकसपणा दर्शवू नका.

Share post
Tags: ३ मे २०२१आजचं राशीभविष्यसोमवार
Previous Post

उद्योजक पिता-पुत्रीने केले प्लाज्मा दान

Next Post

कृषी विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना विमा कवच द्यावे – खा. उन्मेश पाटील

Next Post
कृषी विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना विमा कवच द्यावे - खा. उन्मेश पाटील

कृषी विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना विमा कवच द्यावे - खा. उन्मेश पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group