कर्ज घेणाऱ्या महिलांना 0.05 टक्क्यांची विशेष सवलत दिली जाणार असल्याचे बँकेने म्हटले आहे.
योनो वापरकर्त्यांनाही सूट
याखेरीज योनो अॅप (YONO App) वापरकर्त्यांनाही खास सवलत देण्यात येणार असल्याचे बँकेने म्हटले आहे. एसबीआयने म्हटले आहे की, योनो अॅपद्वारे ग्राहकांची संख्या वाढविण्यासाठी आमच्या गृह कर्जाच्या ग्राहकांकडून डिजिटल प्रोत्साहन म्हणून 0.05 टक्के सूट देण्यात येत आहे
हे काम पूर्ण करण्यासाठी SBI ग्राहकांकडे 31 मे पर्यंत वेळ
लॉकडाऊनमुळे अनेक ग्राहकांना केवायसी अपडेट करण्यात अडचण येत होती. एसबीआयने केवायसी अपडेट करण्याची तारीख पुढे ढकलून ग्राहकांना दिलासा दिला आहे.
आता ग्राहकांची खाती केवायसी नसल्यामुळे 31 मेपर्यंत फ्रीझ होणार नाहीत. शिवाय रजिस्टर्ड इमेल किंवा पोस्टाच्या माध्यमातून पाठवण्यात आलेली कागदपत्र देखील केवायसी साठी ग्राह्य धरली जातील