गुजरात, वृत्तसंस्था | गुजरातमधील भरूच शहरातील पटेल वेलफेयर हाॅस्पीटलमध्ये भीषण आग लागलेली आहे. या आगीच्या घटनेत 18 रूग्ण मृत्यूमुखी पडलेले असून अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे समजत आहे. तर मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रात्री एक वाजता शाॅर्टसर्किंटमुळे आग लागल्याचे प्राथमिक कारण समजत आहे.
गुजरात: भरूच के वेलफेयर अस्पताल के कोविड केयर सेंटर में आग लगने से 14 मरीज़ों सहित कुल 16 लोगों की मौत हो गई। अस्पताल के ट्रस्टी ने बताया, “इस घटना में 14 मरीज़ों की मौत हुई है और स्टाफ नर्स की भी मौत हुई है। कुल 16 लोगों की मौत हुई है।” #COVID19 pic.twitter.com/aGC7Bte8H9
— ANI_HindiNews (@AHindinews) May 1, 2021
कोरोना रूग्णांसाठी असलेले भरूच शहरातील पटेल हाॅस्पीटलमध्ये शुक्रवारी रात्री भीषण आग लागली आहे. आगीच्या राैद्ररुपाने आईसीयू वार्डमध्ये मोेठ्या प्रमाणात पसरली होती. या आगीमुळे रूग्णांना पळण्याचा किंवा जीव वाचविण्यासाठी कोणतीच संधी मिळाली नाही. सध्या या आगीत 18 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी आहेत. चार मजल्यांच्या पटेल हाॅस्पीटलमध्ये 50 रूग्ण उपचारासांठी होते.
घटनेची माहीती मिळताच अग्निशामक दल आग विझविण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले होते. या हाॅस्पीटलमधील अन्य रूग्णांना सिव्हील, सेवाश्रम, जंबूसर अल मेहमूद हाॅस्पीटलसह इतर खासगी दवाखान्यात हलविण्यात आले आहे.