जळगाव – जळगाव पीपल्स बँकेच्या चेअरमनपदी अनिकेत पाटील यांची तर व्हाईस चेअरमनपदी डॉ प्रकाश मांगीलाल कोठारी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. शुक्रवारी संचालक मंडळाची पहिली सभा झाली. यात ही निवड करण्यात आली आहे.
डॉ. प्रकाश कोठारी यांची व्हाईस चेअरमन म्हणून निवड झालेली आहे. ते चार्टर्ड अकाउंटंट असून वित्त क्षेत्रातील अनुभवी व निष्णात आहे. या निवडीवेळी संचालक भालचंद्र पाटील, चंद्रकांत चौधरी, सुनील पाटील, विलास बोरोले, स्मिता पाटील, सुरेखा चौधरी, चंदन अत्तरदे, सुहास महाजन, राजेश परमार, रामेश्वर जाखेटे, प्रविण खडके, ज्ञानेश्वर मोराणकर, पोलिस पाटील प्रभाकर पाटील, दिलीप कोल्हे, भालचंद्र चौधरी, रजनीकांत काळे, अरुण मराठे, ज्ञानदेव नेमाडे, गिरीधर जावळे आदी उपस्थित होते.
सर्वात कमी वयात चेअरमन झालेले पहिले संचालक
अनिकेत पाटील हे केमिकल इंजिनिअर असून ते व्हेगा केमिकल्स प्रा.लि. चे संचालक म्हणून देखील काम बघतात. सर्वांत कमी वयात चेअरमनपदी विराजमान झालेले ते पहिले संचालक आहे. माजी अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी सलग १५ वर्षे सर्वाधिक काळ बँकेचे चेअरमनपद भूषविले आहे. दी मल्टिस्टेट को ऑप सोसायटीज ॲक्ट २००२ नुसार दोन कालावधी पेक्षा जास्त चेअरमनपदी राहू शकत नसल्याने बँकेच्या संचालक मंडळाने बँकेच्या नेतृत्वाचे सूत्र सर्वानुमते अनिकेत पाटील यांच्याकडे सोपवले आहे. ते बँकेचे माजी चेअरमन भालचंद्र पाटील यांचे सुपूत्र आहे.
|
|