जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज १००७ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले असून तर आज दिवसभरामधून जिल्ह्यात २१ बाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच १०३० रुग्ण बरे होऊन घरी परतले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.
जळगाव शहर- १४१, जळगाव ग्रामीण-२०, भुसावळ-१०१, अमळनेर-४७, चोपडा-३२, पाचोरा-१४८, भडगाव-०८, धरणगाव-१२, यावल-३१, एरंडोल-५८, जामनेर-११२, रावेर-४७, पारोळा-१७, चाळीसगाव-५८, मुक्ताईनगर-१११, बोदवड-६१ आणि इतर जिल्ह्यातील ०३ असे एकुण १ हजार ७ रूग्ण आढळून आले आहे.
आजपर्यंत १ लाख २२ हजार ४ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ९ हजार १५९ रूग्ण बरे होवून घरी पतरले आहे. उर्वरित १० हजार ६६१ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. तर आजपर्यंत जिल्ह्यात २ हजार १८४ रुणांचा कोरोनाने बळी घेतला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.