जळगाव – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, उपजिल्हाधिकारी (महसूल) रविंद्र भारदे, तहसीलदार सुरेश थोरात आदि उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनीही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.