जळगाव – भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे संपूर्ण भारतातील कोरोनारुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी टेलीकन्सल्टिंग सुविधा व हेल्पलाईन चा शुभारंभ भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डाजी ह्यांच्या दि. २८ एप्रिल रोजी हस्ते करण्यात आला .
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष व युवा नेतृत्व खासदार श्री.तेजस्वी सूर्या ह्यांच्या संकल्पनेतुन हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे .
संपूर्ण देशातील विविध क्षेत्रातील नामवंत डॉक्टर्स ही सुविधा गरजू रुग्णांसाठी मोफत उपलब्ध करून देत आहेत. या सुविधेअंतर्गत सर्वसामान्य व कोरोनाने भयभीत झालेल्या नागरिकांशी संवाद साधणे , प्राथमिक व मध्यम स्थितीतील कोरोना रुग्णांना वैद्यकीय सल्ला,उपचार आणि मानसिक समुपदेशन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे हेल्पलाईन च्या माध्यमातून ऑक्सिजन बेड उपलब्धता व इतर सुविधा बाबत मदत कार्य आगामी काही दिवस सुरू राहणार आहे .
कोरोना विषाणू विरोधी लसीकरणाबाबत असलेल्या शंका,गैरसमज दुर करणे, योग्य तो सल्ला या माध्यमातून दिला जाणार आहे .
संपूर्ण भारतातून कोव्हिड १९च्या महामारीत गेल्या वर्षापासून जनजागृतीचे उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या काही मोजक्या डॉक्टरांचा या सेवाकार्यात समावेश करण्यात आला आहे .जळगावातील नेत्ररोगतज्ञ डॉ. धर्मेंद्र पाटील व भुलशास्त्र तज्ज्ञ डॉ. नरेंद्र ठाकूर यांच्या आजवरच्या सेवाकार्याची दखल घेत त्यांना राष्ट्रीय स्थरावरील या सेवेमध्ये समाविष्ठ करून घेण्यात आले आहे .
या राष्ट्रीय टेलिकन्सल्टिंग प्रकल्पाच्या
शुभारंभाच्या पूर्वसंध्येला खाजदार श्री.तेजस्वी सूर्या ह्यांनी व्हिडीओ कान्फरसिंग च्या माध्यमातून डॉ. धर्मेंद्र पाटील व डॉ. नरेंद्र ठाकूर यांचेशी संवाद साधून कोरोना काळात देत असलेल्या त्यांच्या सेवेबद्दल उभयता डॉक्टरांचे अभिनंदन केले .
या वेळी बंगलुरू येथील प्रख्यात चेस्ट फिजिशियन व इंटेसीविस्ट डॉ.रवी मेहता यांनी सर्व डॉक्टरांना कोव्हीड व कोव्हीड पच्छात रुग्णांच्या विविध आरोग्य समस्या आणि उपचाराबाबत मार्गदर्शन केले .यापुढेही मुंबई,दिल्ली कलकत्ता ,चेन्नई,पुणे येथील विविध तज्ज्ञ मान्यवर डॉक्टर मंडळी या सेवाकार्यात सहभागी असलेल्या डॉक्टरांना कोरोनाचे बदलते लक्षणे, स्वरूप,उपचार पद्धती या विषयी वेळोवेळी ऑनलाईन मिटींग द्वारे माहिती देणार आहे. या विविध शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांशी प्रत्येक रुग्ण संपर्क साधू शकत नाही परंतु त्यांच्या या ज्ञानाचा फायदा टेलमेडिसीन ,डॉक्टर्स हेल्पलाईन द्वारा सर्वसामान्य गरजू रुग्णांपर्यंत पोहचणार आहे. भारतीय युवा मोर्चा द्वारे सुरू झालेल्या या सेवाकार्यात जळगावातील डॉ.पाटील आणि डॉ. ठाकूर हे देशभरातील गरजू रुग्णांना संवाद साधून मदतीचा हात देणार आहेत .