जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज १०६३ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले असून तर ११०३ रुग बरे होऊन घरी परतले. तसेच जिल्हाभरात आज २१ बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.
जळगाव शहर -१६७, जळगाव ग्रामीण- २१, भुसावळ-९३, अमळनेर-२०५, चोपडा-९०, पाचोरा-४७, भडगाव-९, धरणगाव-२०, यावल-२८, एरंडोल-८६, जामनेर-१२६, रावेर-४६, पारोळा-१९, चाळीसगाव-७४, मुक्ताईनगर-२, बोदवड-२३ आणि इतर जिल्ह्यातील ७ असे एकुण १ हजार ६३ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख २० हजार ९९७ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ८ हजार १२९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. उर्वरित १० हजार ७०५ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात २१ बाधितांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.