पुणे, वृत्तसंस्था : पुण्यात असणारे सीरम इन्स्टिट्यूट ऑक्सफर्ड-एस्ट्राझेनेकाच्या कोविशील्ड लशीची निर्मिती करत आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोविशील्ड लशीची किंमत वेगवेगळी ठरवली होती. मात्र, आता या लशीची किंमत 100 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. राज्य सरकारला ही लस 400 रुपयांना मिळणार होती. मात्र, आता या लशीची प्रति डोस किंमत कमी करण्यात आली असून ती 300 रुपये करण्यात आली आहे.
कोरोना प्रतिबंधक लस कोविशिल्डचं उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं आपल्या लसीची किंमत जाहीर केली होती. त्यानुसार, सर्व राज्यांच्या सरकारी रुग्णालयांसाठी ४०० रुपये तर खासगी रुग्णालयांसाठी ६०० रुपये इतकी किंमत सीरमने निश्चित केली होती. त्याचबरोबर सीरमच्या उत्पादन क्षमतेच्या ५० टक्के लस केंद्र सरकारच्या लसीकरण मोहिमेसाठी देण्यात येणार आहे तर उर्वरित ५० टक्के लस या राज्यांना आणि खासगी रुग्णालयांना देण्यात येणार आहे. अधिकृत निवेदनाद्वारे सीरमने हे जाहीर केलं होतं.