जळगाव, प्रतिनिधी : संपूर्ण देशात कोरोना प्रचंड प्रमाणात थैमान घातल्याने राज्यात रक्तपुरवठा कमि होत असल्याने भा ज पा प्रदेश कार्यालय नुसार संपुर्ण महाराष्ट्र हनुमान जयंती चे निमित्त रक्तदान शिबिर घेण्याचे सांगितले होते. त्यानुसार भाजपा जिल्हा महानगर अंतर्गत भाजपा मंडळ क्रमांक 6 व मं क्र 2, 3 येथे रक्तदान शिबीर व कोरोना अँटिजेंत टेस्ट शिबीर घेण्यात आले.
या शिबिराला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला मंडळ क्र 6 रामानंद नगर व मंडल क्र 2/3 मंडळा तर्फे आज दिनांक 28 एप्रिल रोजी स्व. मीनाताई ठाकरे मार्केट येथे व भा ज पा कार्यालय वसंत स्मृति येथे सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत रक्तदान शिबिर घेण्यात आले.
या शिबिराचे उदघाटन भा.ज.पा. जिल्हाअध्यक्ष आ. सुरेश भोळे (राजू मामा) महानगरअध्यक्ष दीपक सुर्यवंशी यांच्याहस्ते करण्यात आले शिबिराचे आयोजन मंडळ क्रमांक 6 अध्यक्ष अजित राणे ,रमेश जोगी, परेश जगताप, भाजप युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आले होते तसेच हनुमान जयंती निमित्त हरिविठ्ठल नगर येथील बाजार पट्यात कोरोना अँटिजेंट टेस्ट शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या चाचणी शिबिरामध्ये परिसरातील 85 नागरिकांनी कोरोना टेस्ट करून घेतली तसेच रक्तदान शिबिरा मध्ये 37 रक्त दात्यांनी रक्तदान केले. या कार्यक्रमा प्रसंगी जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी ,नितीन इंगळे, प्रदेश महिला आघाडी उपाद्यक्षा उज्वला ताई बेंडाळे नगर सेविका गायत्री ताई राणे , दीपक पाटील, इंद्रजित राणे, जिल्हा पदाधिकारी बापू ठाकरे ,प्रा भगतसिंग निकम राजु मराठे ,मनोज भांडारकर विधानसभा क्षेत्र प्रमुख दीपक साखरे , प्रकाश पंडित प्रभाग समिती सदस्य बंटी नेरपगारे, डॉ दर्शना शाह ,निलेश झोपे, आघाडी अध्यक्ष कुमार श्रीरामे ,जयेश भावसार गणेश माळी युवमोर्चा अध्यक्ष आनंद सपकाळे , उपाध्यक्ष राहुल मिस्तरी , शर्मा जी ,लक्ष्मण धनगर तसेच मंडळाचे पदाधिकारी गौरव उमप , जयेश विसपुते , अमित शिंदे , कार्तिक पाटील , तेजस कोष्टी , धवल चौधरी , केतन अत्तरदे , भावेश कोल्हे , पियुष महाजन , शरद पाटील , अजय चौधरी , शतायु भोंगे , मनोज केसवानी , निलेश सनस , शुभम मराठे इत्यादी उपस्थित होते सदर रक्तदान शिबीरास उत्तम प्रतिसाद मिळाला . या रक्तदान शिबिरास गोळवलकर रक्तपिढीचे डॉ. जागृती लोहार व सहकारी श्रीकांत मुंडले यांचे सहकार्य लाभले असे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख मनोज भांडारकर यांनी कळविले आहे