मुंबई, वृत्तसंस्था । महाराष्ट्रावर पुन्हा संकट कोसळले आहे ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे एका रुग्णालयात मोठी आग लागल्याची घटना आज 28 एप्रिल बुधवार रोजी सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी चार रुग्णांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे जुन्या मुंबई-पुणे रोडवरील शिमला पार्कजवळील हसन टॉवरमध्ये प्राईम क्रिटीकेअर हॉस्पिटल आहे. या रुग्णालयात बुधवारी पहाटे आगीचा भडका उडाला. पहाटे ३ वाजून ४० मिनिटाच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी रुग्णालयात २० रुग्ण उपचार घेत होते. यात आयसीयू वार्डात ६ रुग्ण, तर इतर वार्डात १४ रुग्ण होते.
https://twitter.com/ANI/status/1387218675573264385?s=19
आग लागल्याची माहिती मिळताच मुंब्रा पोलीस, रुग्णावाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले. आयसीयूमधील रुग्णांना तातडीने बिलाल रुग्णालयात हलविण्यात आलं. तर इतर रुग्णांना सुटी देण्यात आली. या घटनेत चार रुग्णांना आपला जीव गमावावा लागला आहे. रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जात चार रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती ठाणे महापालिका प्रशासनाने दिली आहे.