Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

कुसुंबा येथील दाम्पत्याच्या खूनप्रकरणी जिल्‍हा पोलिस अधीक्षकांची पत्रकार परिषद (व्हिडिओ)

by Divya Jalgaon Team
April 26, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
कुसुंबा येथील दाम्पत्याच्या खूनप्रकरणी जिल्‍हा पोलिस अधीक्षकांची पत्रकार परिषद (व्हिडिओ)

जळगाव प्रतिनिधी । आज कुसूंबा येथील भागातील पाटील दाम्पत्याच्या खुनाचा तपास पाचव्या दिवशी सकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला आहे. या हत्याकांडात दोन पुरूषांसह एक महिलेचा समावेश आहे. याप्रकरणी सर्व आरोपींना पोलिसांनी अटक करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.

एमआयडीसी पोलीस स्थानकात दाखल झालेल्या या गुन्ह्यात जिल्‍हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे, अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हेचे निरीक्षक किरण कुमार बकाले यांचे पथके तपास करत असतांना सलग सहा रात्र आणि पाच दिवसांचा तपास पुर्ण करुन गुन्हेशाखेच्या पथकाने चार संशयीतांना ताब्यात घेतले. दोन महिला आणि दोन पुरुश अशा चार संशयीतांना ताब्यात घेतले. कसुन चौकशी केल्यावर गुन्ह्यातील प्रत्यक्ष सहभागी तिघांनी कबुली दिल्याने त्यांना अटक करण्यात आली. त्यात देविदास नादेव श्रीनाथ (वय-४०,रा.गुरुदत्त कॉलनी कुसूंबा), अरुणाबाई गजानन वारंगे (वय-३० कुसूंबा) आणि सुधाकर रामलाल पाटिल (वय-४५रा.चिंचखेडा ता. जामनेर) अशांना अटक करण्यात आली आहे.

कुसूंबा भागातील ओमसाईनगरात वर्षभरा पुर्वीच घरबांधुन राहण्यास आलेल्या मुरलीधर राजाराम पाटिल(वय-५४) व त्याची पत्नी आशाबाई पाटिल(वय-४७) या दोघांचा २१ एप्रिल रोजी राहत्या घरात दोरीने गळा आवळून खुन करण्यात आला हेता. मयत अरुणाबाई गेल्या अनेक वर्षांपासुन व्याजाचा धंदा करते, तीने नुकतेच दुमजली टोलेजंग घरबांधले असून तिच्या घरात बऱ्यापैकी रोकड आणि सोन्याचे दागिने मिळतील यांची खात्री असल्यानेच देविदास आणि अरुणाबाईने कट रचला. सोबतीला देविदासचा मित्र सुधाकर पाटिल याची मदत घेण्यात आली. अरुणाबाईचे घेणे असलेली रक्कमही द्यावी लागणार नाही आणि तिच्या घरातील घबाडातून हिस्साही मिळेल अशी लालसा अरुणाबाईला हेती. तर सुधाकर कर्जबाजारी झालेला होता.

देविदास याला अर्थीक अडचण असल्याने तिघांनी तिचा काटा काढायचा निर्णय घेत बुधवार २१ एप्रिल रोजीच्या रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अगोदर मुरलीधर पाटिल याचा गच्चीवर गळा आवळला. तदनंतर आशाबाईला खाली घरात त्याच दोरीने गळफास देत ठार मारण्यात आल्याची कबुली संशयीतांनी दिली आहे. निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील सजय हिवरकर,विजयसींग पाटिल, राजेश मेंढे, सुनील दामोदरे, विजय पाटील, नरेंद्र वारुळे, दिनेश बडगुजर, रवि नरवाडे, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, संतोश मायकल यांच्यासह एकुण ४७ कर्मचाऱ्यांचा विवीध पथकात समावेश होता.

Share post
Tags: JalgaonMarathi Newsकुसुंबा येथील दाम्पत्याचा मृत्यू प्रकरणी चार संशयित आरोपींना अटक
Previous Post

कोरोना हाताळण्यात राज्य सरकार १०० टक्के अयशस्वी

Next Post

जिल्ह्यात आज २१ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू, १०४८ जण कोरोनाबाधित

Next Post
जिल्ह्यात आज १०६३ रूग्ण कोरोनाबाधित आढळले, २१ जणांचा मृत्यू

जिल्ह्यात आज २१ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू, १०४८ जण कोरोनाबाधित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group