जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज २१ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाले आहे. यात आज दिवसभरामधून १०४८ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहे. तर १०१५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.
जळगाव शहर-159, जळगाव ग्रामीण-53, भुसावळ-157, अमळनेर-71, चोपडा-72, पाचोरा-57, भडगाव-18, धरणगाव-42, यावल-33, एरंडोल- 113, जामनेर-37, रावेर-74, पारोळा-28, चाळीसगाव-66, मुक्ताईनगर-37, बोदवड-15 आणि इतर जिल्ह्यातील 16 असे एकुण 1048 बाधित रूग्ण आढळून आले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख १७ हजार ९१६ बाधित रूग्ण आढळून आले असून त्यापैकी १ लाख ४ हजार ९०६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. उर्वरित १० हजार ९११ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात २१ बाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.