Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

कोरोना लसीकरण जनजागृतीसाठी मुकुंद गोसावी यांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती

by Divya Jalgaon Team
April 26, 2021
in आरोग्य, जळगाव
0
कोरोना लसीकरण जनजागृतीसाठी मुकुंद गोसावी यांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती

जळगाव – जिल्ह्यात कोरोना लसीकरण कार्याला अधिक गती यावी सोबतच ग्रामीण भागातील नागरिकांना तसेच दिव्यांग, ज्येष्ठ व शासनाच्या निर्देशानुसार ज्यांना लसीकरणात समाविष्ट केले आहे. त्या साऱ्यांना लसीकरण कार्याची प्रभावी माहिती देऊन शंभर टक्के लसीकरणाची अंमलबजावणी व्हावी. याकरिता कोरोना लसीकरण कार्याचे ब्रॅण्ड ॲम्बेसेडर (स्टार प्रचारक) म्हणून मुकुंद गोसावी यांची जिल्हा शल्यचिकित्सक तथा नोडल अधिकारी कोविड-19 डॉ. एन. एस. चव्हाण यांनी नियुक्ती केल्याचे प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

मुक्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष मुकुंद गोसावी हे सामाजिक व आरोग्य विषयक कार्यात नेहमी स्वयंस्फूर्तीने निरपेक्षपणे सहभागी होतात. रक्तदान, अवयवदान, नेत्रदान, देहदान, व्यसनमुक्ती, तंबाखुमुक्ती, कॅन्सर, कृष्ठरोग, क्षयरोग, एडस निर्मूलन, पल्स पोलीओ, मानसिक आरोग्य तसेच विविध आरोग्य शिबीरांमध्ये आरोग्य यंत्रणेला सहकार्य नेहमी सहकार्य करीत असतात.

श्री. गोसावी यांनी कोरोनाच्या कठीण काळातही शारीरीक व्यंगाला न जुमानता कोरोना जनजागृती पत्रक वाटप, मास्क, सॅनेटाईझर वाटप, पॉझिटीव्ह रुग्णांची भीती कमी करणे, त्यांचे समुपदेशन करणे, रुग्णांना वैद्यकीय सेवेचे सहकार्य आदि कार्यही तन्मयतेने करतात. असेही डॉ. चव्हाण यांनी नियुक्तीपत्रात म्हटले आहे.

Share post
Tags: #Mukund GosaviCoronaJalgaonVaccineकोरोना लसीकरण जनजागृतीसाठी मुकुंद गोसावी यांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती
Previous Post

शेतकऱ्यांनी घरगुती सोयाबीन बियाणे राखून ठेवण्याचे कृषि विभागाचे आवाहन

Next Post

कोरोना निर्बधाच्या कालावधीत दस्तनोंदणीस उपस्थित राहणे हे वैध कारण समजावे

Next Post

कोरोना निर्बधाच्या कालावधीत दस्तनोंदणीस उपस्थित राहणे हे वैध कारण समजावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group