जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज १०४६ रुग्ण कोरोनाबाधीत आढळून आले असून तर जिल्ह्यात आज दिवसभरामध्ये २१ बाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच १००६ रुग्ण बरे होऊन घरी परतल्याची माहिती मिळाली आहे.
आज दिवसभरात पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या ही पुन्हा एकदा अकराशेच्या आत म्हणजेच १०४६ इतकी झाली आहे.काल हाच आकडा १०४८ इतका होता. तर गत चोवीस तासांमध्ये १००६ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे आता बाधीत आणि बरे होणार्यांचे प्रमाण जवळपास समान असल्याचे दिसून आले आहे. तर आज देखील काल प्रमाणेच दिवसभरात जिल्ह्यात २१ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर-१६५; जळगाव ग्रामीण-३२; भुसावळ-९७; अमळनेर-४१; चोपडा-११०; पाचोरा-६०; भडगाव-२७; धरणगाव-३०; यावल-३६; एरंडोल-१०१; जामनेर-६३; रावेर-१०२; पारोळा-३७; चाळीसगाव-४३; मुक्ताईनगर-७३; बोदवड-२२ आणि इतर जिल्ह्यांमधील ७ असे रूग्ण आढळून आले आहेत.