जळगाव, प्रतिनिधी । शहरात २२ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास एका कारचालकाने दुचाकीस्वारास धडक दिल्याची घटना हॉटेल रॉयल पॅलेसजवळ घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्थानकात अज्ञात चारचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील रॉयल पॅलेससमोरून दि. २२ एप्रिल रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास पंकज गोपाल देशमुख हे ड्युटी आटोपून घरीत जात होते. यादरम्यान हॉटेल रॉयल पॅलेससमोर एम. एच. १९ सी. एफ. २९२८ या क्रमांकाच्या चालकाने टर्न घेतांना देशमुख यांच्या दुचाकीला धडक दिली. यात देशमुख याच्या उजव्या दंडाला व कमरेला जबर दुखापत झाली आहे. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरुन पसार झाला. याप्रकरणी आज शनिवारी पंकज देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रामानंदनगर पोलिसात एम.एच.१९ सी.एफ २९२८ या क्रमाकांच्या चारचाकीवरुन अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना सुशील पाटील हे करीत आहेत.