मुंबई, वृत्तसंस्था । मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात सीबीआयनं राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या प्रकरणी सीबीआय वेगवेगळ्या ठिकाणी तपास करत आहे, असंही ANI नं म्हटलं आहे.
CBI has registered an FIR against former Maharashtra Home Minister Anil Deshmukh and others in connection with allegations made by former Mumbai Police Commissioner Param Bir Singh. CBI is conducting searches at various places
— ANI (@ANI) April 24, 2021
/p
भ्रष्टाचार विरोधी कायदा आणि कलम 120ब (संगनमताने केलेला गुन्हा) अंतर्गत सीबीआयने देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सीबीआयच्या प्रवक्त्यांनी बीबीसीला दिल्लेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं FIR मध्ये आरोपी म्हणून नाव आहे.
त्याचयोबत इतर अज्ञात लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
सीबीआय दिल्लीची टीम कोर्टाच्या आदेशानंतर मुंबईत चौकशी करत होती. आज सकाळपासून याप्रकरणी चौकशीसाठी विविध ठिकाणी छापेमारी सुरू आहे.
नागपूर आणि मुंबईमध्ये सीबीआयने हे छापे टाकले आहेत. अनिल देशमुखांच्या नागपूर आणि काटोलच्या घरी तर मुंबईतल्या सुखदा सोसायटीमधल्या घरी सीबीआयने छापे टाकले आहेत.
अनिल देशमुख या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं समजयतंय.
गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता.
अनिल देशमुख यांनी केलेल्या भ्रष्ट वर्तणुकीची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी’ अशी याचिका माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती.
उच्च न्यायालयानं या प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश न्यायालयाने दिले आणि त्यानंतर 5 एप्रिलला अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.