Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जिल्ह्यात कोरोनापाठोपाठ सारी आजारानेही रुग्णांचा मृत्यू

by Divya Jalgaon Team
April 24, 2021
in आरोग्य, जळगाव, प्रशासन
0
देशात २४ तासात जवळपास १४ हजार कोरोना बाधितांची नोंद

जळगाव : जिल्ह्यात एकीकडे कोरोनामुळे अनेक जण दगावत असताना दुसरीकडे कोरोनासदृश्य असलेल्या सारी आजाराने ही मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोजी चव्हाण यांनी दिलेल्या माहितीने प्रशासनासह सर्व सामान्य जनतेच्या चिंता वाढल्या आहेत.

सध्या संपूर्ण देशभर कोरोनाचा प्रसार वाढला असल्याने दिवसागणिक कोरोनाने बाधित होणाऱ्यांची संख्या आणि त्यामुळे मृत्यू पावणाऱ्याची संख्या विक्रमी आकडे गाठत आहे. एकीकडे असे चित्र असताना कोरोनाच्या या काळात कोरोनाबाधितांच्या मृत्यूच्या 25 ते 30 टक्के मृत्यू हे सारी आजाराने झाल्याचे समोर आले आहे.

आतापर्यंत दोन हजार जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, त्याच्या पंचवीस टक्के म्हणजेच 500 जणांचा मृत्यू हा मागील वर्षापासून आतापर्यंत झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

श्वसन विकार, न्युमोनिया, टीबी या सारख्या विकाराचं गंभीर रुप झाल्याने फुफ्फुसाला इंफेक्शन होते. रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो, ऑक्सिजन पातळी कमी होऊन त्याचा परिणाम शरीराच्या सर्व भागावर होऊन रुग्णाचा मृत्यू होतो. या आजाराला सारी म्हटलं जातं. पूर्वीपासून असलेला हा आजार पुढील काळात देखील राहण्याची शक्यता आहे.

सर्दी, खोकला होतो तो वाढत जाऊन न्युमोनिया होतो. न्युमोनियामुळे फुफ्फुसात इंफेक्शन पसरत जाते आणि पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन न मिळाल्याने रुग्ण दगावतो, अशा पद्धतीने सारीच्या रुग्णांचा मृत्यू होतो.

सर्दी, ताप, खोकला ही कोरोनाची प्रमुख लक्षणे आहेत, तिच लक्षणे सारीची सुद्धा आहेत. या लक्षणाच्या आधारे कोरोनाची चाचणी केली जाते, ती पॉझिटिव्ह आली तर कोरोना समजला जातो आणि ती निगेटिव्ह आली तर तो सारी आजार समजला जातो. दोघांची लक्षणे सारखीच असल्याने उपचार देखील जवळजवळ सारखेच आहेत.

सुरुवातीच्या काळातच या दोन्ही आजारात रुग्णांवर उपचार सुरु झाले तर रुग्ण लवकर बरा होण्याची जास्त शक्यता असते आणि उशीर केला तर रुग्ण दगावण्याची शक्यता बळावते. यासाठी वेळीच औषधोपचार जेवढा महत्त्वाचा असतो तेवढाच श्वसनाचे व्यायाम करणे, प्राणायाम करणे हे देखील उपाय म्हणून केले तर या आजारावर सहज मात करणे शक्य आहे.

सारी आणि कोरोना या दोन्ही विकारात लक्षणे सारखीच असल्याने उपचार पद्धती ही सारखीच आहे मात्र बुरशीजन्य आजार रुग्णात जास्त असेल तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे अधिक असते आणि व्हायरल इन्फेक्शन असेल तर बरे होण्याचे प्रमाण कमी असल्याचंही दिसून येते, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

Share post
Tags: CoronaJalgaonSaariजिल्ह्यात कोरोनापाठोपाठ सारी आजारानेही रुग्णांचा मृत्यू
Previous Post

आजचे राशीभविष्य, शनिवार, २४ एप्रिल २०२१

Next Post

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल

Next Post
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सुरक्षा गार्डचे अपघाती निधन

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group