जळगाव – कोरोना चा वाढता प्रादुर्भाव आणि गेल्या काही दिवसात राज्यात घडत असलेल्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेत कोरोना रुग्णांची योग्य काळजी घेतली जात आहे का ? यासाठी आज जळगाव येथील इकरा यूनियन मेडिकल कॉलेज येथील कोवीड सेंटरची महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी पाहणी केली.
यावेळी महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी कोवीड सेंटर मधील रुग्णांना दिले जाणारे जेवणाचे पॅकेट्स तपासून पाहिले. त्याच बरोबर कोविड सेंटर मधील रुग्णांशी संवाद साधला. उपचारादरम्यान रुग्णांना सर्व सोयी सुविधा, औषधी वेळेवर आणि व्यवस्थित दिल्या जात आहेत का , अशी चौकशी ही केली . तसेच काही तक्रार असल्यास जारी केलेल्या हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधू शकता असेही सांगितले .
महापौर व उपमहापौर यांनी कोवीड सेंटरमधील डॉक्टरांशी ही चर्चा केली. तसेच राज्यात आतापर्यंत चार ठिकाणी अग्नितांडव झाले असल्याने खबरदारी म्हणुन कोविड सेंटरमधील ऑक्सिजनचा पुरवठा तसेच अग्निशामक सुविधा यांचाही आढावा घेतला. यावेळी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, नगरसेवक कुंदन काळे, अजय देशमुख, हर्षल मावळे आदींची उपस्थिती होती.