जळगाव – महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे पंढरपूराचे विठ्ठल. पंढरपूरातील माती, हवा, पाणी म्हणजे भक्तीचा सागर. चंद्रभागेच्या काठावर भगवंताच्या ओढ लागल्याशिवाय राहतच नाही. शेतकी खात्यामध्ये शासकीय सेवेची सुरूवात पंढरपूरातून करीत असताना येथूनच श्रीराम भक्तीचा मनात जागर झाला आणि थेट ‘अयोध्या’नगरी जळगावपर्यंत गेल्या 61 वर्षापासून अव्याहतपणे सुरूच आहे. वयाच्या 83 व्या वर्षी सुध्दा ‘श्रीराम जय राम जय जय राम’ नामजाप लिहताना तितकाच उत्साह भोळे अण्णांमध्ये दिसतो. भोळे अण्णांचे कार्य म्हणजे प्रत्येकाला प्रेरणा देणारेच आहे. त्यांचा हा प्रेरदायी प्रवास सर्वांना माहित व्हावे यासाठीच
राम नवमीच्या दिवशी भानुदास धर्मा भोळे यांची घेतलेली मुलाखत…
प्रभू श्रीराम म्हणजे प्रत्येकाच्या मनाचा आरसा. ‘राम’ नामाचा जप म्हणजे भारतीय संस्कृती. न्याय, समता आणि सहिष्णूतेची शिकवण म्हणजे मर्यादा पुरूषोत्तमांचा सांस्कृतिक वारसा. सूर्यप्रतापी विष्णूअवतारी प्रभू रामचंद्राचे सदगुण मनुष्याला आपल्या मर्यादेत राहून प्रत्येकाच्या मनात राम जागृत करण्याचे कार्य जळगावातील ‘अयोध्या’नगर मधील भोळे अण्णा ऊर्फ भानुदास धर्मा भोळे करीत आहे.
धर्म उपदेशापर बोधात्मक विचारांचे संकलन हा भोळे अण्णांचा आवडता छंद. धर्म कार्यासाठी अण्णांना त्यांची पत्नी विमल ह्या सुध्दा प्रोत्साहन देतात.लिहण्याचा छंद जोपासता जोपासता चांगल्या विचारांचे विचारधन गुरू तपस्वी गोपालदास यांच्या प्रेरणेतुन त्यांनी पुस्तक रूपात संग्रहीत केले आहे. सुमारे 400 च्या वर कुटूंबियांना सुविचारांचे अनमोल विचारधन मोफत वाटप केले.
प्रभू रामचंद्राचे चरित्र हे प्रत्येक माणसांच्या जीवनव्यहारात उतरावे कृतिशील आचरणात यावे या आस्थेपोटीच गेल्या 61 वर्षापासून रामभक्तीमध्ये लिन झाल्याचे भोळे अण्णा सांगतात. अयोध्यानगरमध्ये प्रभू श्रीराम आणि जानकी मातेचे मंदिर असावे अशी मनस्वी ईच्छा होती तशा मुलांशी भोळे अण्णांनी संवाद साधला मुलांनीही अयोध्या नगर मधील रहिवासी यांच्याशी चर्चा करून त्यांचे सहकार्य घेत प्रभू श्रीराम मंदिराचे निर्माण केले.
https://www.youtube.com/watch?v=vUpVUgaaYnM


