जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यात आज दिवसभरात १०३४ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले असून तर १२०४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तसेच १८ जणांचा मृत्यू झाले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.
जळगाव शहर-१७५, जळगाव ग्रामीण-४७, भुसावळ ८६, अमळनेर-६७, चोपडा-५८, पाचोरा-५३, भडगाव-१०, धरणगाव-४२, यावल-६७, एरंडोल-५४ , जामनेर-१११ , रावेर-९६, पारोळा-२४, चाळीसगाव-४९, मुक्ताईनगर-१८, बोदवड-७० आणि इतर जिल्ह्यातील ७ असे एकुण १ हजार ३४ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अहवालात जिल्ह्यात एकुण १ लाख १३ हजार ७०४ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ७५८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर १० हजार ९३० बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज अहवालात लक्षणिय बाब म्हणजे दिवसभरात एकुण १८ बाधितांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.