जळगाव – शहरातील गोलाणी मार्केटमध्ये अस्वच्छता वाढली असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने महापौरांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. मंगळवारी सकाळीच गोलाणीमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असून महापौर जयश्री महाजन यांनी पाहणी केली.
गोलाणी मार्केटमध्ये अस्वच्छता पसरली असल्याने नागरीक व व्यावसायिकांची तक्रार येत होती. महापौर यांनी आरोग्य विभागाला सूचना देऊन स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते. मंगळवारी सकाळी मनपाच्या आरोग्य विभागामार्फत गोलाणी मार्केटमध्ये साफसफाई मोहीम राबविण्यात आली. लॉकडाऊन असल्याने मोहीम राबविणे सोयीस्कर झाले. महापौर जयश्री महाजन यांनी स्वच्छतेची पाहणी केली. यावेळी सहाय्यक आयुक्त पवन पाटील, आरोग्य निरीक्षक रमेश कांबळे, संजय अत्तरदे आदींसह इतर कर्मचारी उपस्थित होते.