Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

मनपाच्या कोविड सेंटरमध्ये जेवणाचा दर्जा खालावला, अनेकांना जेवण नाहीच(व्हिडीओ)

रुग्णांची तक्रार : नगरसेवक कैलास सोनवणे यांनी विचारला अधिकाऱ्यांना जाब

by Divya Jalgaon Team
April 19, 2021
in आरोग्य, जळगाव, प्रशासन
0
मनपाच्या कोविड सेंटरमध्ये जेवणाचा दर्जा खालावला, अनेकांना जेवण नाहीच(व्हिडीओ)

जळगाव – शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात सुरू असलेल्या मनपाच्या कोविड सेंटरमध्ये काही रुग्णांना जेवण उपलब्ध होत नाही. रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाचा दर्जा खालावला असल्याच्या तक्रारी नगरसेवक कैलास सोनवणे यांना प्राप्त झाल्या असता त्यांनी भेट देत पाहणी केली. नागरिकांच्या तक्रारी ऐकून नगरसेवक कैलास सोनवणे यांनी अधिकाऱ्यांना बोलावून जाब विचारला.

शहर मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये नागरिकांना वेळेवर जेवण मिळत नाही, काही नागरिकांना जेवण, नाश्ता उपलब्ध होत नाही, जेवणात फळ म्हणून दररोज केळीच दिली जाते अशा तक्रारी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. गेल्या दोन दिवसांपासून त्याच तक्रारी येत असल्याने सोमवारी दुपारी नगरसेवक कैलास सोनवणे यांनी भगवान सोनवणे यांच्यासह जाऊन पाहणी केली. कोविड रुग्णांशी चर्चा केली असता त्यांनी आपल्या समस्या सांगितल्या. कैलास सोनवणे यांनी लागलीच महापौरांशी याबाबत संवाद साधला. तसेच मनपा अधिकारी शुक्ला व नाष्ट्ये यांना बोलावून घेतले.

नगरसेवक कैलास सोनवणे यांनी मनपा भांडारपालला विचारणा केली असता जेवणाचा मक्ता पूजा केटरर्सला दिला असून प्रति व्यक्ती प्रति दिवस १४० रुपये प्रमाणे खर्च दिला जातो. मक्तेदाराने दोन वेळा जेवण, दोन वेळा चहा, एक वेळ नाश्ता आणि फळे देण्याचे त्यात नमूद असल्याची माहिती त्याने दिली. फळे केवळ केळी द्यावी का? जेवणाचा दर्जा तपासण्याची जबाबदारी का पार पाडली जात नाही याबाबत नगरसेवक सोनवणे यांनी मनपा अधिकाऱ्यांना विचारणा केली. तसेच नागरिकांची तक्रार लेखी घेऊन मनपा आयुक्तांना कळवावे, असेही सोनवणे यांनी सांगितले.

Share post
Tags: Corona PatientDivya Jalgaon Newsजेवणाचा दर्जा खालावलानगरसेवक कैलास सोनवणे
Previous Post

येत्या दहा दिवसांत बेवारस वाहने घेऊन जाण्याचे आवाहन

Next Post

कामगार सुविधा केंद्रामार्फत हजारो कामगारांचे समुपदेशन

Next Post
कामगार सुविधा केंद्रामार्फत हजारो कामगारांचे समुपदेशन

कामगार सुविधा केंद्रामार्फत हजारो कामगारांचे समुपदेशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group