नवी दिल्ली, वृत्तसंस्था – जागतिक बाजारात सोने आणि चांदीचे दर वाढले आहेत. त्या प्रमाणात भारतीय बाजारातही सोने आणि चांदीच्या दरात वाढ नोंदली गेली. एचडीएफसी सिक्युरिटी संस्थेचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढल्यामुळे दिल्ली सराफात सोन्याचे दर 159 रुपयांनी वाढून 46,301 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. त्याचबरोबर तयार चांदीचा दर 206 रुपयांनी वाढून 67,168 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढून 1,745 डॉलर तर चांदीचे दर 25.52 डॉलर प्रती औंस झाले.
सध्या तुलनेने सोने आणि चांदीचे दर कमी पातळीवर आहेत. त्यामुळे बरेच गुंतवणूकदार सोन्याची खरेदी खरेदी करीत असल्याचे वातावरण आहे. आगामी काळात लग्नाचा उत्सव सुरू होणार आहे. त्यामुळेही बरेच कुटूंबीय सोन्याची खरेदी करीत असल्याचे वातावरण आहे.