जळगाव – कार्यकाळ पुर्ण झालेल्या पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश विशेष पोलीस निरीक्षकांकडून काढण्यात आले आहे. यात जिल्ह्यातील दोन निरीक्षकांच्या बदल्या झाल्या असून काही जण बदलवून आले आहे. यात शहरातील जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक अकबर पटेल यांची धुळे येथ बदली झाली आहे.
ज्या पोलीस निरीक्षकांचा कार्यकाळ पुर्ण झाला आहे यासह विनंती बदल्यांचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून गुुरुवारी सायंकाळी काढण्यात आले. यात संपुर्ण राज्यभरातील पोलीस अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील यांची झाली बदली
शहरातील जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अकबर अब्दुल पटेल यांची पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे, काशिनाथ गंगाराम पवार यांची नंदुरबार, जिल्हा जातपडताळणी पोलीस निरीक्षक सुधीर भीमसिंग पाटील यांची नवी मुंबई तर रामानंद पोलीस ठाण्याचे सारीका वसंत खैरनार व सुहास मधुकर राऊत यांची मसुप येथे तर प्रवीण पुंडलिक साळुंखे यांची कोल्हापुर परिक्षेत्र येथे बदली झाली आहे.
जिल्ह्यात बदलवून येणारे अधिकारी
जिल्ह्यातून सहा पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाली असून इतर जिल्ह्यातील अधिकारी देखील बदलून येणार आहे. यामध्ये बुलढाणा येथील जिल्हा जात पडताळणीचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण नारायण पवार, धुळे येथील प्रशिक्षण केंद्राचे ज्ञानेश्वर निवृत्ती जाधव तर ठाणे येथील विलास वसंतराव शेंडे यांची जळगाव जिल्ह्यात बदली झाली आहे. बदली झालेल्यांना तात्काळ कार्यमुक्त व हजर होण्याचे आदेश देखील विशेष पोलीस महानिरीक्षकाचे अस्थापनाचे राजेश प्रधान यांनी आदेश काढले आहे.
अजून वाचा
डॉ. आश्विन सोनवणे यांनी दिला उपमहापौरपदाचा राजीनामा