जळगाव – जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्या.जळगाव संस्थेच्या मुख्य कार्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित लोकसंघर्ष मोर्चा च्या अध्यक्ष प्रतिभा ताई शिंदे ज.जि.मविप्र चे संचालक ॲड.विजय भास्करराव पाटील, जळगाव मनपा माजी नगरसेवक सुनील भैया माळी, लोकसंघर्ष मोर्चा चे सचिन दादा धांडे,देविदास ठाकरे,अमोल कोल्हे, एस एन पाटील यांनी महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला माल्यार्पण करून अभिवादन केले.