मुंबई, वृत्तसंस्था । कोरोनाच्या मोठ्या (Corona Wave ) लाटेला थोपविण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतरच्या काळात ऑक्सिजन प्लॅन्टची (Oxygen plant) उभारणी, बेड्स व इतर वैद्यकीय सुचिधा वाढवणे, रेमडीसीव्हीर उपलब्ध करणे, लसीकरण वाढवणे व विशेषत: सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देणे यादृष्टीने चर्चा झाली. महाराष्ट्राला अधिक लसींचा पुरवठा व्हावा अशी विनंती परत एकदा आपण पंतप्रधानांना करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या कोरोना टास्क फोर्सच्या बैठकीला केवळ टास्क फोर्सचे सदस्य आणि मी होतो, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.