Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

खान्देशात 70 हजार शेतकऱ्यांनी केला 77 कोटींचा विजबिल भरणा

वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी शेतकरी सरसावले, कृषी वीजयंत्रणेसाठी मिळणार हक्काचा 53 कोटींचा निधी

by Divya Jalgaon Team
April 12, 2021
in जळगाव, प्रशासन, राज्य
0
कृषी वीज धोरणाच्या अंमलबजावणीस खान्देशात वेग, 38 हजार शेतकऱ्यांनी केला 37 कोटींचा भरणा

जळगाव/धुळे/नंदूरबार : महा कृषी ऊर्जा अभियानात कृषिपंपांच्या थकबाकीत तब्बल 66 टक्के सवलत मिळवत खान्देशातील जवळपास 70 हजार शेतकऱ्यांनी 77 कोटींचा भरणा केला आहे. या अभियानातील सहभागासोबतच आपल्या ग्रामपंचायत व जिल्हा क्षेत्रातील कृषी वीजयंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणासाठी तब्बल 53 कोटींचा हक्काचा 66 टक्के निधीही या शेतकऱ्यांना मिळणार आहे.

महा कृषी ऊर्जा अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे वीजबिलांतून थकबाकीमुक्त होण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांसह खान्देशातील शेतकऱ्यांनीही पुढाकार घेतला आहे. राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकारातून वीजबिलांच्या वसुलीमधील तब्बल 66 टक्के रकमेचा निधी हा संबंधित ग्रामपंचायत व जिल्ह्यातील कृषी वीजयंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी वापरण्यात येणार आहे. या महत्त्वाच्या तरतुदीमुळे शेतकरी‍ बिल भरण्यास प्रतिसाद देत आहेत. मागील वर्षी 1 एप्रिल 2020 पासून जमा होणाऱ्या वसुलीच्या रकमेची कृषी आकस्मिक निधी म्हणून स्वतंत्र नोंद ठेवली जात आहे. खान्देशाच्या कृषी आकस्मिक निधीमध्ये चालू व थकीत वीजबिलांच्या भरण्यातून आतापर्यंत एकूण 80 कोटी 54 लाख रुपये जमा झाले आहेत. त्यापैकी 66 टक्के रक्कम म्हणजे तब्बल 53 कोटी 16 लाख रुपयांचा निधी संबंधित ग्रामपंचायत व जिल्ह्यातील कृषी वीजयंत्रणेच्या विविध कामांसाठी वापरण्यात येणार आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी सर्व शेतकऱ्यांचे अभिनंदन केले असून शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्तीसह ग्रामपंचायत व जिल्ह्यातील वीजविषयक विकासासाठी गावकऱ्यांनी यापुढेही सकारात्मक भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे.

या अभियानात कृषिपंपांच्या वीजबिलापोटी जळगाव जिल्ह्यातील 35 हजार 386 शेतकऱ्यांनी 44 कोटी 34 लाख, धुळे जिल्ह्यातील 20 हजार 190 शेतकऱ्यांनी 13 कोटी 13 लाख तर नंदुरबार जिल्ह्यातील 14 हजार 119 शेतकऱ्यांनी 19 कोटी 31 लाख असे खान्देशात 69 हजार 695 शेतकऱ्यांनी 76 कोटी 78 लाख रुपये भरले आहेत. कृषी आकस्मिक निधीमध्ये जळगाव जिल्ह्यास 30 कोटी 64 लाख, धुळे जिल्ह्यास 9 कोटी तर नंदुरबार जिल्ह्यास 13 कोटी 52 लाख रुपये उपलब्ध झाले आहेत. नवीन उपकेंद्र, वितरण रोहित्र, वीजजोडण्या, कृषी वाहिन्या आदींच्या कामांसाठी या निधीचा वापर होणार आहे. संबंंधित ग्रामपंचायत व जिल्ह्यातील वीजविषयक विविध कामांचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे तर अनेक ठिकाणी कामांना प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.

Share post
Tags: JalgaonMahavitaranखान्देशात 70 हजार शेतकऱ्यांनी केला 77 कोटींचा विजबिल भरणा
Previous Post

आजचे राशीभविष्य, सोमवार, १२ एप्रिल २०२१

Next Post

6 मिनिटे वॉक टेस्ट घ्या, मगच दाखल करा; टास्क फोर्सकडून महत्वाचे सल्ले

Next Post
देशात आज कोरोना लसीचा ड्राय रन; 'अशी' आहे तयारी

6 मिनिटे वॉक टेस्ट घ्या, मगच दाखल करा; टास्क फोर्सकडून महत्वाचे सल्ले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group