Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जुन्या वादातून दोन गट एकमेकांना भिडले, फायरिंग केल्याने खळबळ

by Divya Jalgaon Team
April 11, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
भुसावळात पुन्हा गोळीबार, जुन्या वादातून झाडल्या गोळ्या

जळगाव प्रतिनिधी । शहरातील चौघुले प्लॉट भागात जुन्या वादातून दोन गट एकमेकांना भिडले असून यात एका गटाने फायरिंग केल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून चौकशी करण्यात आली.

शनिपेठेतील चौघुले प्लॉट परिसरात आज दुपारी दोन गटांमध्ये धुमश्‍चक्री झाली. या भागातील सारवान आणि शिंदे या दोन्ही गटांमध्ये जुना वाद असून यातूनच आज दुपारी राडा झाला. याप्रसंगी एका गटाने फायरिंग केल्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. गोळी झाडल्यानंतर दोन्ही गटाच्या तरूणांनी घटना स्थळावरून पलायन केले.

शनिपेठसह एलसीबीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी चौकशीला प्रारंभ केला आहे. फायरिंग केल्यानंतर खाली पडलेले कार्टीरेज पोलिसांना आढळून आले असून ते पंचनामा करून ताब्यात घेण्यात आलेले आहे. तर अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी देखील घटनास्थळाची पाहणी करून सहकार्‍यांना तपासाबाबत सूचना दिल्यात. चौघुले प्लॉटमधील गोळीबारात दोन्ही गटाच्या संशयितांबाबत माहिती जमा करण्यात आले असून संशयितांची नावे निष्पन्न झाली असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

Share post
Tags: Crime newsJalgaonजुन्या वादातून दोन गट एकमेकांना भिडलेफायरिंग केल्याने खळबळ
Previous Post

डोळयात मिरची टाकुन लुटणा-या आरोपीला पकडण्यात यश

Next Post

30 एप्रिलपर्यंत लागु निर्बंधांबाबत जिल्हाधिकार्‍यांनी काढले स्पष्टीकरणात्मक आदेश

Next Post
दिलासादायक ! देशात २४ तासांमध्ये ४३ हजार ८५१ जण करोनामुक्त

30 एप्रिलपर्यंत लागु निर्बंधांबाबत जिल्हाधिकार्‍यांनी काढले स्पष्टीकरणात्मक आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group