जळगाव – चारचाकी वाहन धारकांना थांबवून डोळयात मिरची टाकुन लुटणा-या जिगर बोंडारेच्या गैंग मधील फरार आरोपी अजय सुदाम भिल वय-२२ रा.नशिराबाद रोड उमाळा ता.जि. जळगांव यास आज स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना यश
शनिवारी सायंकाळी ७ ते ८ वाजेच्या दरम्यान उमाळा गावातील व जिगर बोंडारे यांचे गॅंगमधील सराईत गुन्हेगार व काही गुन्ह्यात फरार आरोपी हे वेष बदलून गावात आल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखा यांना मिळाली होती त्यानुसार उमाळा गावात सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. काही दिवसापूर्वी एम.आय.डी.सीत व्यापाऱ्याला मारहाण करून सोने व पैसे लुटण्याचा घडली होती. त्यादिवसापासून गुन्हयात फरार आरोपी अजय सुदाम भिल वय-२२ रा.नशिराबाद रोड उमाळा ता.जि. जळगांव यास अटक केली व त्यास विचारपुस केली असता त्याने या गुन्हयाची कबुली दिली तसेच जिगर बोंडारेच्या गैंग मध्ये काम करत असल्याचे सांगितले. या आरोपीची वैदयकीय चाचणी करुन पुढील कार्यवाही साठी एम.आय.डी.सीत पोस्टे चे ताब्यात दिले.


