जळगाव – लसीकरणाच्या पुरवठ्यामध्ये केंद्र सरकारचा महाराष्ट्र सोबत केलेल्या दुजाभावाचा जळगाव जिल्हा काँग्रेस पक्षाच्यावतीने “मूक निदर्शने” द्वारे काळे झेंडे दाखवून जाहीर निषेध करण्यात आला आहे.
आज जळगाव जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्या नेतृत्वाखाली व जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष संदीप भैय्या पाटील व एन एस यु आय चे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या प्रमुख उपस्थितीत गेल्या, काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोणाची अतिशय बिकट परिस्थिती उद्भवलेली असताना महाराष्ट्र राज्याला जितक्या लसीकरण डोसची आवश्यकता आहे,तितके लसीकरणाचे ढोस हेतुपुरस्कर केवळ भाजपची महाराष्ट्र मध्ये सत्ता नसल्यामुळे केंद्र सरकार पुरवठा करीत नसल्याचा चित्र संपूर्ण महाराष्ट्र मध्ये दिसून येत आहे.
केंद्र सरकारचा महाराष्ट्र राज्य सोबतचा हा दुजाभाव काँग्रेस पक्ष कदापि खपवून घेणार नाही.
कोरोना सारख्या या महामारी मध्ये केंद्रातील भाजप सरकारने राजकारण न करता देशातील सर्व राज्यांना समान न्याय देण्याची भूमिका पार पाडायला पाहिजे. परंतु मोदी सरकार हेतुपुरस्कर महाराष्ट्र राज्यांमध्ये भाजपची सत्ता नसल्यामुळे महाराष्ट्रातील महाविकासआघाडी ला जास्तीत जास्त अडचणींमध्ये अणण्याकरता महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या जीवाशी खेळ करीत आहे.
आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले,विधिमंडळ गटनेते महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या आदेशानुसार जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी खासदार डॉ उल्हास पाटील यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली व जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील व एन एस यु आय चे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्र सरकारने महाराष्ट्र सोबत केलेल्या लसीकरण पुरवठा मधील दुजाभावाचा मुक निदर्शना द्वारे काळे झेंडे दाखवून जाहीर निषेध व्यक्त केला.
याप्रसंगी माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील जिल्हा अध्यक्ष संदीप पाटील, एन एस यु आय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, श्याम तायडे जमील शेख आदी पदाधिकारी कोरोणाचे सर्व प्रकारचे निर्बंध पाडून उपस्थित होते.