जळगाव – राज्याचे गृहमंत्री ना. अनिल देशमुख हे रविवार १ नोव्हेंबर रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून अमळनेर येथील कार्यक्रमास उपस्थिती देणार आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.
असा असेल गृहमंत्री देशमुख यांचा दौरा
* रविवार १ नोव्हेंबर, २०२० रोजी दुपारी १०.३० वाजता शहादा येथून हेलीकॉप्टरने अमळनेरकडे प्रयाण.
* दुपारी १४.१५ वा. अमळनेर हॅलीपॅड येथे आगमन व आमदार अनिल पाटील यांचे निवासस्थानाकडे प्रयाण व राखीव.
* दुपारी १५.०० ते १५.४५ वाजेपर्यंत अमळनेर येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी निवासस्थानांचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व सन्मानीय लोकप्रतिनिधीच्या उपस्थितीत उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती.
* दुपारी १५.५० वा. अमळनेर नगरपरीषद येथील जिजाऊ महिला व्यायाम शाळा व सवित्रीबाई फुले अभ्यासिकेचे उद्घाटन
तद्नंतर अमळनेर हेलीपॅडकडे प्रयाण
दुपारी १६.१५ वा. हेलीकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण.