जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज ११४१ रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून यात आज जिल्ह्यामध्ये १४ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर-१६८, जळगाव ग्रामीण-२७, भुसावळ-१०२, अमळनेर-५३, चोपडा-७९, पाचोरा-१२१, भडगाव-३२, धरणगाव-५५, यावल-६२, एरंडाल-४१, जामनेर-४४, रावेर-८८, पारोळा-३७, चाळीसगाव-३२, मुक्ताईनगर-९२, बोदवड-१०३ आणि इतर जिल्ह्यातील ५ असे एकुण १ हजार १४१ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
जिल्हा रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात आजपर्यंत ९७ हजार ९९ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ८३ हजार ६७१ रूग्ण बरे होवून घरी पतरले आहे. तर ११ हजार ७०२ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज जिल्ह्यात १४ बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स अधिकारी डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.