पाचोरा (अनिल येवले) – येथील डॉ. स्वप्नील पाटील आणि त्यांच्या पत्नी डॉ. ग्रीष्मा पाटील यांनी सुरू केलेले सिद्धिविनायक हॉस्पिटल आज इतर सर्व रुग्णांसोबतच कोवीड रुग्णांसाठी एक आशेचा किरण बनलेला असून डॉ. स्वप्नील पाटील आणि त्यांच्या संपूर्ण सिद्धिविनायक हॉस्पिटल टीम ने रुग्णसेवेत स्वतःला झोकून दिले असून अनेक कोवीड रुग्ण बरे होऊन निरामय जीवनाचा आनंद घेत आहेत.
उत्कृष्ट उपचार पद्धती तसेच रूग्णासह रूग्णाच्या आर्थिक परिस्थितीचाही विचार करून परिस्थिती हाताळण्याची हातोटी यामुळे डॉ. स्वप्नील पाटील आज लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले असून त्याचे संपूर्ण श्रेय त्यांच्याकडे असलेल्या सखोल ज्ञान,अनुभव आणि त्यांचा स्वभाव या गोष्टींना दिले जात आहे.
पाचोरा शहरच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात डॉक्टर स्वप्नील पाटील आणि सिद्धिविनायक हॉस्पिटल हे एक आदराचे स्थान निर्माण झाले असून अतिउत्तम उपचार घेण्यासाठी या रुग्णालयात रुग्णांचा ओढा वाढला आहे. त्यांच्या या यशात त्यांच्या सौभाग्यवती डॉ. ग्रीष्मा पाटील यांचे देखील अमूल्य योगदान असून या दाम्पत्याच्या हाताने अशीच रूग्णसेवा अखंड घडत राहो याच सदिच्छा!