गुजरात – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत म्हटलं, “जनसंघ आणि भाजपला बळकट करण्यासाठी केशुभाईंनी संपूर्ण गुजरातभर प्रवास केला. त्यांनी आणीबाणीचा प्रखर विरोध केला. शेतकरी कल्याणाचे प्रश्न त्यांच्या जिव्हाळ्याचे होते. ते आमदार, खासदार, मंत्री किंवा मुख्यमंत्री कुठल्याही पदावर असले तरी ते शेतकऱ्यांचे प्रश्न हिरिरीने सोडवत असत.”
“केशुभाईंनी माझ्यासह अनेक तरुण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आणि तयार केलं. प्रत्येकालाच त्यांचा प्रेमळ स्वभाव खूप आवडला. त्यांच्या निधनानं एक भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनानं आपण सर्वजण दु: खी आहोत. मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे,” असंही मोदींनी म्हटलं आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्वीट केलं की, “केशुभाई पटेल हे सार्वजनिक जीवनात अमिट छाप सोडणारे एक प्रभावी प्रशासक होते. ते जनतेची सेवा करण्याच्या त्यांच्या प्रतिबद्धतेबद्दल कायम स्मरणात राहतील. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून दु:ख झालं आहे.”