मुंबई, वृत्तसंस्था : इयत्ता बारावी बोर्डाची परीक्षा २३ एप्रिलपासून राज्यभर ठरलेल्या वेळापत्रकानुसार ऑफलाइन घेतली जाईल.
त्यानुसार आता या परीक्षेचे प्रवेशपत्र (हाॅल तिकीट) विद्यार्थ्यांना महाविद्यालयांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून दिले जाईल. ३ एप्रिलपासून मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर महाविद्यालयांना ही प्रवेशपत्रे ऑनलाइन उपलब्ध होणार असून पुढे ती विद्यार्थ्यांना प्रिंट स्वरूपात देण्याची जबाबदारी उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांची असेल.
विद्यार्थ्यांना प्रिंट काढून दिल्यानंतर हॉल तिकिटावर उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांची स्वाक्षरी आणि शिक्का त्या हॉल तिकिटावर असणे आवश्यक आहे.