जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज ११६७ रूग्ण कारोनाबाधित आढळले असून जिल्ह्यामधे १३ रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात आजपर्यंत ९० हजार १८५ कोरोना रूग्ण आढळून आले आहे.
जळगाव शहर-१०१, जळगाव ग्रामीण-१४, भुसावळ-१२६, अमळनेर-१२२, चोपडा-३०७, पाचोरा-२८, भडगाव-६८, धरणगाव-४६, यावल-६६, एरंडोल-२७, जामनेर-७७, रावेर-६५, पारोळा-१९, चाळीसगाव-५९, मुक्ताईनगर-२१, बोदवड-३१ आणि इतर जिल्ह्यातील ३ असे एकुण १ हजार १६७ रूग्ण आढळून आले आहे.
त्यापैकी ७६ हजार ७३४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ११ हजार ८१३ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. जळगाव शहर-४, भुसावळ-१, अमळनेर-२, चोपडा-१, भडगाव-१, धरणगाव-१, यावल-१, एरंडोल-१, आणि पारोळा- १ असे १३ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.