Friday, April 3, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावात पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या

by Divya Jalgaon Team
April 1, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
किनगाव येथील त्या महीलेवर चाकुहल्ला करणाऱ्या व्यक्तिने केली आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । शहरातील एमआयडीसी पोलीस स्थानकातील कर्मचाऱ्याची पत्नीने आज गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रयत्न केला. सकाळच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जिजाऊ नगर येथील रहिवासी सुरेखा संतोष सोनवणे (वय ३३) असे मृत महिलेचे नाव आहे. तीचे पती संतोष सोनवणे हे एमआयडीसी पोलिस ठाण्यात नियुक्तीस आहेत. सुरेखा ह्या ३१ मार्च रोजी घरात कुणीही नसतांना दुपारी २ वाजता गळफास घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी शेजारचांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यांची प्रकृती अत्यावस्थ होती. आज १ एप्रिल पहाटे तीन वाजता त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, सुरेखा यांच्या बहिण मनीषा अर्जुन भालेराव (रा. पालघर) व भाऊ जितेश शिरसाठ (रा. खर्दे, ता. शिरपुर) यांना ही घटना कळाल्यानंतर ते आज जळगावात दाखल झाले होते. रूग्णालयात दाखल होताच त्यांनी आक्रोश करत त्यांनी सुरेखा यांचे पती संतोष सोनवणे यांच्यावर आरोप केला. संतोष सोनवणे हा गेल्या सहा महिन्यांपासून पत्नी सुरेखाचा शारिरीक व मानसिक छळ करीत होता. तीला कोणाशीही बोलु देत नसे. गेल्या महिनाभरापासून पत्नीचा मोबाईल देखील स्वत:जवळ ठेवून घेतला होता. यामुळे ती माहेरच्या लोकांच्या संपर्कातही नव्हती. पतीच्या सततच्या त्रासामुळे कंटाळुन बहिणीने आत्महत्या केली आहे असा आरोप केला आहे. या प्रकरणात तिच्या पतीविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मनीषा भालेराव व जितेश शिरसाठ यांनी केली आहे.

Share post
Tags: Crime newsJalgaonSuicideजळगावात पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या
Previous Post

विकास मल्हारा यांच्या चित्राला ‘आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ पुरस्कार

Next Post

जिल्ह्यात आज ११६७ रूग्ण कोरोनाबाधित आढळले

Next Post
जिल्ह्यात आज १०६३ रूग्ण कोरोनाबाधित आढळले, २१ जणांचा मृत्यू

जिल्ह्यात आज ११६७ रूग्ण कोरोनाबाधित आढळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group