जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज पुन्हा ११३९ रुग्ण कोरोनाबाधीत आढळून आले असून यात दिवसभरात १४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात आजपर्यंत ८९ हजार १८ कोरोना रूग्ण आढळून आले आहे.
जिल्ह्याचा विचार केला असता, जळगाव शहर-२८३, जळगाव ग्रामीण-१७, भुसावळ-७७, अमळनेर-९३, चोपडा-२७७, पाचोरा-३५, भडगाव-२०, धरणगाव-५६, यावल-२८, एरंडोल-४८, जामनेर-३३, रावेर-२१, पारोळा-१८, चाळीसगाव-९७, मुक्ताईनगर-११, बोदवड-१७ आणि इतर जिल्ह्यातील ७ असे एकुण १ हजार १३९ रूग्ण आढळून आले आहे. सर्वाधीक रूग्ण हे जळगाव शहर तर याच्या खालोखाल चोपडा तालुक्यातील आहेत.
त्यापैकी ७५ हजार ५९० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ११ हजार ८०३ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. जळगाव शहर-४, चोपडा-३, जळगाव ग्रामीण-१, भुसावळ-१, पाचोरा-१, धरणगाव-१, जामनेर-१, पारोळा -१ आणि चाळीसगाव-१ असे १४ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.


