नवी दिल्ली । भोजपुरी अभिनेते तथा खासदार मनोज तिवारी हेलिकॉप्ट अपघातातून थोडक्यात बचावले आहे. मनोज तिवारींच्या हेलिकॉप्टरनं यशस्वीरित्या एमर्जन्सी लँडींग केल्यानंतर हा धोका टळला आहे. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सध्या मनोज तिवारी व्यस्त आहे.
प्रचार रॅलीत जात असतांना अचानक मनोज तिवारी यांच्या हेलिकॉप्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हेलिकॉप्टरची एमर्जन्सी लँडींग करण्यात आली. आणि त्यात ते थोडक्यात बचावले आहे. दरम्यान बिहार निवडणुकीने बिगुल वाजल्यानंतर राजकीय मंडळी प्रचारासाठी सज्ज झाले आहे. भाजपाचे नेते मनोज तिवारी यांच्या जिवाला धोका असल्याचं कारण देत त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली होती. त्यांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आले आहे.